महिला प्रीमियर लीगच्या तारखा जाहीर, २३ दिवस या दोन मैदानांवर होणार चुरशीच्या लढती



 महिला प्रीमियर लीगच्या तारखा जाहीर, २३ दिवस या दोन मैदानांवर होणार चुरशीच्या लढती 

मुंबई: बहुप्रतीक्षित अशी महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला सीझन यंदा खेळवला जाणार आहे . या लीगसाठी फ्रँचायझीची घोषणा झाल्यानंतर आता हे सामने कधी कुठे खेळवले जाणार आहेत, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन येत्या महिन्यात ४ मार्च ते २६ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष रन धुमाळ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

इंडियन प्रीमियर लीगचे https://www.highcpmrevenuenetwork.com/syw2xegp6e?key=87fb52e7ed42f87270357b1dcd148c89 (आयपीएल) अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले, "महिला प्रीमियर लीग ४ ते २६ मार्च दरम्यान मुंबईत खेळवली जाईल." ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम हे स्पर्धेतील सर्व सामने आयोजित करतील. ज्यामध्ये गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या फ्रँचायझी संघांमध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे.


क्रिकेटआयपीएल २०२३

क्रिकेट न्यूज

वेळापत्रकटी-20 विश्वचषक 2022

Hi User

Read & earn rewards with TimesPoints!


KNOW HOW

Login

Edition

IND

व्हिडिओ

खेळ

इन्फोटेक

सिनेमॅजिक

धर्म

महाराष्ट्र

बजेट २०२३


सिनेमा

न्यूज

लाइफस्टाइल

कार-बाइक

इन्फोटेक

संपादकीय

भविष्य

Web Stories

करिअर

Viral

थोडक्यात

आपला बाजार

देश

विदेश

अर्थ

इतर

व्हिडिओ

फोटोगॅलरी

राजकारण

पर्यावरण

निवडणूक

बेस्ट सेलर

गुन्हेगारी

मटा ई पेपर

ब्लॉग

फोटो धमाल

कृषी

मटा ऑनलाइनची २५ वर्षे

वेबस्टोरी

हेडलाईन

सरकारी योजना

मटा सुपरवुमन


भारत विरुद्ध बांगलादेशफिफा वर्ल्डकप 2022हार्दिक पंड्याभारतीय क्रिकेट संघ



महिला प्रीमियर लीगच्या तारखा जाहीर, २३ दिवस या दोन मैदानांवर होणार चुरशीच्या लढती

Authored by Bhakti Gurav | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 7 Feb 2023, 11:27 am

Women Premiere League Schedule: महिला प्रीमियर लीगची सुरुवात पुढील महिन्यात ४ मार्चपासून होणार आहे. सर्व सामने मुंबईच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. लवकरच खेळाडूंचा लिलावही जाहीर केला जाईल.

 

मुंबई: बहुप्रतीक्षित अशी महिला प्रीमियर लीग (WPL) चा पहिला सीझन यंदा खेळवला जाणार आहे. या लीगसाठी फ्रँचायझीची घोषणा झाल्यानंतर आता हे सामने कधी कुठे खेळवले जाणार आहेत, याबाबतची माहिती आता समोर आली आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला सीझन येत्या महिन्यात ४ मार्च ते २६ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचे अध्यक्ष रन धुमाळ यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Women Premiere League 2023 Schedule

ADV- मोबाइल फोनवर दिवसाचे ट्रेंडिंग डील- सर्वात कमी किमतीत परवडणारे 4G फोन मिळवा

इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले, "महिला प्रीमियर लीग ४ ते २६ मार्च दरम्यान मुंबईत खेळवली जाईल." ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डी वाय पाटील स्टेडियम हे स्पर्धेतील सर्व सामने आयोजित करतील. ज्यामध्ये गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या फ्रँचायझी संघांमध्ये पहिला सामना खेळवला जाणार आहे.

धुमाळ यांनी महिला प्रीमियर लीगसाठी लिलाव कधी होणार हे देखील त्यांनी सांगितले. या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव पाकिस्तान विरुद्ध भारताच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यानंतर १३ फेब्रुवारी रो जी मुंबईत होणार आहे. बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) ने लीगचे प्रसारण हक्क ९५१ कोटी रुपयांना विकले असून पाच संघांसाठी बोलीचे ४६६९.९९ कोटी रुपये मिळवले, ज्यामुळे महिला प्रीमियर लीग ही इंडियन प्रीमियर लीग नंतर जगातील दुसरी सर्वात मोठी टी-२० लीग बनली.

मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघांव्यतिरिक्त, कॅप्री ग्लोबल होल्डिंग्स (लखनऊ) आणि अदानी स्पोर्टलाइन यांनी डब्ल्यूपीएलसाठी फ्रेंचायझी संघ विकत घेतले आहेत. सुमारे १५०० खेळाडूंनी लीगसाठी नोंदणी केली असून या आठवड्याच्या अखेरीस अंतिम यादी जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

प्रत्येक फ्रँचायझी संघ लिलावात खेळाडूंवर १२ कोटी रुपये खर्च करू शकतो. संघांना किमान १५ आणि कमाल १८ खेळाडूंसाठी यशस्वी बोली लावावी लागेल. लीगमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील आणि गुणतालिकेत अव्वल असणारा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. विजेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये बाद फेरीचा सामना खेळवण्यात येईल.


Post a Comment

Previous Post Next Post